Santosh Deshmukh murder case: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करुन यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. आरोपी दोन क्रमांक वर विष्णू चाटे याच नाव आहे. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पुरावे मिळाले. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ सीआयडीकडे सोपावण्यात आले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचा आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचा आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख आहे. आरोप पत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू चाटे याचा उल्लेख आहे. त्यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली. त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचे देखील पुढे आले आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांच्याकडे वाल्मीक कराड विष्णू चाटेच्या मोबाईल वरून फोन गेला आणि त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली. 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती.
6 डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळेंशी आवादा पवनचक्की प्रकल्पावर वाद घडला. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे.
आरोपी क्रमांक एक- वाल्मीक कराड
आरोपी क्रमांक दोन- विष्णू चाटे
आरोपी क्रमांक तीन- सुदर्शन घुले
आरोपी क्रमांक चार- प्रतीक घुले
आरोपी क्रमांक पाच- सुधीर सांगळे
आरोपी क्रमांक सहा- महेश केदार
आरोपी क्रमांक सात- जयराम चाटे
आरोपी क्रमांक 8 फरार- कृष्णा आंधळे
नववा आरोपी- सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे.