Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वरुण सरदेसाई संदीप देशपांडेंच्या भेटीला; दादरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट

वरुण सरदेसाई संदीप देशपांडेंच्या भेटीला; दादरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट

हिंदी भाषेच्या मुद्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना UBT आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि मनसे नेत्यांची लंच डिप्लोमसी पाहायला मिळाली. मुंबईत दादर इथल्या एका हॉटेलमध्ये शिवसेना UBTचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला. 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी भेट घेतल्याचं वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.. तर कुणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी भाजपला दिलाय.

Read More