Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र दिन ! ठाकरे यांचं वसई पालघरचं संपूर्ण भाषण-सभा

राज ठाकरे यांच्या वसई - पालघर सभेचा संपूर्ण व्हिडीओ पाहा.

महाराष्ट्र दिन ! ठाकरे यांचं वसई पालघरचं संपूर्ण भाषण-सभा

पालघर : राज ठाकरे यांनी आज आपल्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्ताने पालघरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत. स्वत:च्या हिंमतीवर आलेले मुख्यमंत्री नसल्याची टीका केली आहे. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. बुलेट ट्रेनसाठी जबरदस्तीने तुमची जमीन घेतली गेल्यास बुलेट ट्रेनचे रूळ उखडून फेका, असं यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं. बुलेट ट्रेन ही महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, पण यात महाराष्ट्रातील लोकांची यात जमीन जात असल्याचं सांगितलं. एकंदरीत राज ठाकरे यांनी आजच्या सभेत सरकारवर चौफेर टीका केली आणि मोठ्या प्रमाणात चिमटे काढले.

Read More