Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भांडखोर बायको नको रे बाबा! म्हणत पुरुषांकडून पिंपळाला प्रदक्षिणा अन् प्रार्थना

Vat Purnima 2025 : अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात...   

भांडखोर बायको नको रे बाबा! म्हणत पुरुषांकडून पिंपळाला प्रदक्षिणा अन् प्रार्थना

Vat Purnima 2025 : दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालत आणि यथासांग त्याची पूजाअर्चा करत महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. विवाहाचं हे नातं सात जन्मांसाठी टिकून रहावं आणि याच जोडीदाराची आपल्याला साथ मिळाली, जोडीदाराला उदंड आयुष्य लाभावं यासाठी केली जाणारी ही पूजा. मात्र आधुनिक काळात याच वटपौर्णिमेला फाटा फोडणारी एक नवी प्रथाही अनेकांचच लक्ष वेधत आहे. 

एकिकडे जन्मोन् जन्मी हाच पती हवा यासाठी महिलांचे उपवास, पूजाअर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीनगर इथं पिंपळ पौर्णिमा साजरा करण्यात आली. पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारत पतीला वेठीस धरणाऱ्या, वैवाहिक जीवनात कलह करणाऱ्या पत्नी पुढच्या जन्मात नको रे बाबा! अशीच प्रार्थना करत पुरुषांनी पिंपळ वृक्षाला 7 प्रदक्षिणा मारल्या. पत्नीपीडित संघटनेनं हा उपक्रम राबवल्याचं सांगण्यात आलं. 

महिलांनी हाच पती हवा यासाठी वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा मारल्या तरीही काही महिला मात्र इथं अपवाद ठरत असून महिला सक्षमीकरणासाठीच्या कायद्याचा दुरुपयोग करताना दिसतात. अनेकदा कायद्याचा दुरुपयोग करताना दिसतात. काही महिला कायद्याच्या नावाखाली पतीला आणि पतीच्या कुटुंबाला अडकवतात, अशा परिस्थितीमध्ये पुरुषांचाही मानसिक छळ होतो. याचाच विरोध म्हणून प्रतिकात्मक स्वरुपात ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते असं या संघटनेचं मत. 

हेसुद्धा वाचा : माझ्या मुलीला फाशीच द्या; 'बेवफा सोनम'च्या आईची मागणी, मुलीच्या प्रियकराबद्दलही सांगितलं...

 

पाच वर्षांपासून साजरी होतेय पिंपळ पौर्णिमा 

पुरुषांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे अन्याय आणि तत्सम मुद्द्यांकडे समाज आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रमाकडून पाच वर्षांपासून ही पौर्णिमा साजरी केली जात आहे. पुरुषांप्रतिसुद्धा समाजिक मानसिकता सुधारण्याची गरज असल्याची मागणी या संघटनेकडून केली जात आहे. 

Read More