अमर काणे, झी 24 तास, नागपूर: नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.. कळमना परिसरात तर भटक्या कुत्र्यामुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा जीव गेलाय. जयेश बोकडे असं या मुलाचं नाव आहे.. रविवारी जयेश मित्रांसोबत खेळून घरी जात होता. यावेळी एक भटका कुत्रा भुंकत जयेशच्या मागे लागला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी जयेश देव हाईट्स या त्याच्या इमारतीत शिरला. याच इमारतीत जयेश पाचव्या मजल्यावर राहत होता. मात्र भटका कुत्रा पाठलाग सोडत नसल्याने जय सहाविया मजल्यावर पळाला. मात्र कुत्र्याने तरिही पाठलाग सोडला नाही. कुत्र्यापासून बचावासाठी जयेश सहाव्या मजल्याच्या खिडकिजवळ पोहोचला. मात्र खिडकिली ग्रील्स नसल्याने तोल जाऊन जयेश सहाव्या महज्यावरून थेट खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. जखमी अवस्थेत त्याला पारडी येतील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
भटक्या कुत्र्याच्या पाठलागामुळे जयेशचा मृत्यू झाल्यानं पावनगाव परिसरात शोककळा पसरलीय. जयेशच्या मृत्यूमुळे नागपुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसतोय. कारण हे भटके कुत्रे आता इमारतींमध्ये घुसायला लागल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरलीय.
यापूर्वीही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काहींचा जीव गेलाय. तर अनेक जण जखमी झालेत. मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांकडून होणारे हल्ले नेहमीचेच झालेत. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांची ही दहशत आता इमारतींच्या आतपर्यंत पोहोचलेय.. त्यातच जयेश सारख्या मुलाचा बळी गेलाय. आता तरी प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा बदोबस्त तत्काळ करेल अशी अपेक्षा.