Viral Video : सध्या सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही लोक आपले विचार शेअर करत असतात तर काही लोक मजेदार गोष्टी. कारण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म हे सर्वांसाठी आहे. यामध्ये लोक फोटो आणि व्हिडीओ हे मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. चला तर मग पाहूयात काय आहे व्हिडीओमध्ये.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी परीक्षा देताना दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या शेजारी रंगीत पेन्सिलचा बॉक्स देखील दिसत आहे. यामध्ये ती पेपर आणि हातात पेन घेऊन हा पेपर सोडवताना दिसत आहे. मात्र, तिने हा पेपर सोडवण्यासाठी ज्या प्रकारे कॉपी केली आहे. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण कोणी कल्पनाही करू शकत नाही की विद्यार्थी अशा प्रकारे कॉपी करू शकतात. तिने केलेली कॉपी ही कोणाच्याही लवकर लक्षात येणार नाही अशी आहे.
कारण तिने जवळ ठेवलेल्या रंगीत पेन्सिलच्या बॉक्समध्ये मोबाईल ठेवला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने या फोनला रंगीत पेन्सिलचा वॉलपेपर ठेवला आहे. त्यामुळे ती कॉपी करून झाल्यानंतर तो वॉलपेपर ठेवत आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाला समजणार नाही की ती कॉपी करते. तिची ही कॉपी करण्याची पद्धत पाहून अनेकांनी आपल्या डोक्याला हात लावला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Technologia pic.twitter.com/qrzXFF6uIj
— Alarka (@MrAlarka) June 4, 2025
हा व्हिडीओ X प्लॅटफॉर्मवर @MrAlarka नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तंत्रज्ञान असं लिहिलं आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही वापरकर्त्यांनी या व्हिडीओला अद्भूत तंत्रज्ञान म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.