Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Video: गर्दीचा फायदा घेत लंपास केलं महिलेचं गंठण..cctv मध्ये घटना कैद..

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत  हा सर्व प्रकार घडलाय आणि ही संपूर्ण घटना बस स्थानकावरील cctv  मध्ये कैद झालेय. 

Video: गर्दीचा फायदा घेत लंपास केलं महिलेचं गंठण..cctv मध्ये घटना कैद..

mangalsutra chori video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात, काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.

चोरीच्या अनेक घटना दररोज आपल्याला ऐकायला मिळतात त्याचे व्हिडीओ आपण पाहतो. काही सराईत गुन्हेगार कशाप्रकारे सराईतपणे हातचलाखीने महिलांचे  दागिने, खिशातील पैसे, पर्समधील वस्तू कसे लंपास करतात हे पाहून तर आपल्यालाच धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना इंदापूरमधून समोर आली आहे. या घटनेत बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण लंपास केलय. 

आणखी वाचा: फुकटात फिरा..या ठिकाणी traveling आहे फ्री फ्री फ्री !

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत  हा सर्व प्रकार घडलाय आणि ही संपूर्ण घटना बस स्थानकावरील cctv  मध्ये कैद झालेय. 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो  गर्दीचा फायदा घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलांच्या टोळीने शारदा कांबळे या महिलेचं सोन्याचं गंठण कशाप्रकारे   चलाखीने लंपास केलं.

आणखी वाचा:दही बनवेल तुम्हाला आणखी सुंदर.. असा करा वापर

CCTV  फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपस करत आहेत. मात्र तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गर्दीच्या ठिकाणी जात असाल किंवा प्रवास करत असाल तर आपल्या मौल्यवान गोष्टी नक्की सांभाळून ठेवा आणि असल्या चोरट्यांपासून सावध राहा. 

Read More