Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मराठी नाही, हिंदीतच बोलणार...', मुंबईनंतर आता पुण्यातील VIDEO व्हायरल, D-Mart मध्ये राडा

पुण्यातील डी-मार्टमध्ये मराठी बोलण्यावरुन वाद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर त्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.   

'मराठी नाही, हिंदीतच बोलणार...', मुंबईनंतर आता पुण्यातील VIDEO व्हायरल, D-Mart मध्ये राडा

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी बोलण्यावरुन वाद होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना, महाराष्ट्रातच मराठी भाषा हाल सोसत असल्याचं चित्र दिसत आहे. आता तर थेट विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातही अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील डी-मार्टमध्ये एका व्यक्तीला मराठीत बोलण्यासाठी आग्रह केला असता, मी हिंदीत बोलणार असं सांगत त्याने मराठी बोलण्यास नकार दिला. वाघोलीत ही घटना घडली आहे. 

'मराठी का आलं पाहिजे? महाराष्ट्रात असं कुठे लिहिलं आहे?', एअरटेलच्या गॅलरीत महिला कर्मचाऱ्याचा उद्धटपणा, VIDEO व्हायरल

 

व्हिडीओत दिसत आहे की, एक व्यक्ती डी-मार्टमध्ये आपल्या पत्नीसह आहे. यावेळी एक व्यक्ती त्याला मराठीत बोलण्यास सांगतो. त्यावर तो उत्तर देतो की, 'हिंदीच बोलणार'. जेव्हा ती व्यक्ती त्याला पुन्हा एकदा मराठी बोलण्यास सांगतो तेव्हा तो म्हणतो, 'नाही बोलणार. तू सोशल मीडियावर टाक. ही तुझी पद्धत चुकीची आहे'. यादरम्यान तो संतापतो आणि तू अशा प्रकारे व्हिडीओ शूट करु शकत नाही सांगतो. 'तू मला विचारल्याशिवाय व्हिडीओ शूट करु शकत नाही,' असं तो सांगतो. 

या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून काहींनी जर व्यक्ती महाराष्ट्रात राहत असेल तर त्याला मराठी आलं पाहिजे असं म्हटलं आहे, तर काहींनी एखाद्या व्यक्तीला जी भाषा सर्वोत्तम येते तीच बोलली पाहिजे असं मत मांडलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यातील वाकडेवाडी येथे एअरटेलच्या व्यवस्थापकाला कार्यालयात हिंदी भाषेच्या सक्तीचे आदेश दिल्याबद्दल मारहाण केल्यानंतर काही महिन्यांनी हा व्हिडिओ आला आहे.

एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात हिंदी बोलण्यास सक्तीचे करण्यास सांगण्यात आलं होतं. जर ते मराठीत बोलले तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्रीय कर्मचाऱ्यांना सणांच्या दिवशी सुट्ट्या देण्यात येत नव्हत्या आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगारही देण्यात आले नाहीत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिस्थितीबद्दल मनसेकडे तक्रार केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाकडेवाडी येथील एअरटेलच्या कार्यालयात घुसून व्यवस्थापकाला मारहाण केली.

Read More