Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Viral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी, तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Little Boy Viral Video : वर्गात सरांनी हार्मोनियम वाजवायला घेतली, संगीताचे सूर त्याचा कानावर पडताच त्या विद्यार्थ्याला हारवलं नाही मग त्याने...सोशल मीडियावर गुरु शिष्याची ही जुगलबंदी यूजर्सचं मनं जिंकत आहे. 

Viral Video : 'नटरंग'वर गुरु -शिष्याची अनोखी जुगलबंदी,  तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Student Teacher Viral Video : सोशल मीडिया अनेक व्हिडीओचा खजिना आहे. धक्कादायक व्हिडीओपासून आपल्याला हसवणारे अनेक व्हिडीओ या इंटरनेटवर पाहिला मिळतात. सोशल मीडियामुळे लोकांमधील लपलेली कला आज जगासमोर येतं आहे. डान्स, संगीत आणि अभिनय असे वेगवेगळे पैलू दिसून येतं आहेत. कानाकोपऱ्यात असे अनेक लोकं आहेत ज्यांचे टॅलेन्ट हे अनेक वेळा त्यांनाच माहिती नसतं. 

आज सोशल मीडियामुळे जगाच्या कुठल्या कोपऱ्यातील घटना आज आपल्याला बसल्या जागी पाहिला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका जिल्हा परिषदेतील शाळेतील गुरु शिष्याची जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेते आहे.  

संगीताचा वर्ग भरला होता. सरांनी हार्मोनियमवर नटरंग सिनेमातील एक गाणं वाजवायला घेतलं. वर्गातील विद्यार्थी मंत्रमुग्ध झाली होती. तेवढ्यात पहिल्याच बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला मोह आवरला नाही आणि त्याने बेंच वाजवत सरांना साथ दिली. 

या क्षणाचा व्हिडीओ तिथे असलेल्या एका शिक्षकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. गुरु शिष्याच्या या जुगलबंदीचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स म्हणत आहेत की, अजय अतुल नक्कीच या मुलाचे चाहते होणार. 

हा व्हिडीओ अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील देवगावातील आहे. या शिष्याचं नाव आहे आर्यन भांगरे तर गुरु आहेत संतोष मोरे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवरील निसर्गरम्य जुन्नर तालुका या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 357K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

Read More