Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!

सुजाता आंबी यांनी या सांगितलं की, 'बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत होती, तेव्हा वाटेत त्यांना साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं?'

व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : सुजाता आंबी यांनी या सांगितलं की, 'बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत होती, तेव्हा वाटेत त्यांना साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं?'

'जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होतं, आणि आदल्या दिवशी पलूसजवळ बोट उलटल्याची बातमी आली होती, त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती. आमची मुलं आमचं परिवार या बोटीत होतं. पण आर्मीवाल्यांनी आम्हाला व्यवस्थित पोहोचवलं, आणि म्हणून मला त्यांच्या पाया पडावसं वाटलं. म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!' अशा शब्दात सुजाता आंबी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता, पण आता आर्मीवाले दिसतायत कारण त्यांनी आम्हाला मृत्यूच्या तावडीतून सोडवलं', असं सुजाता आंबी यांनी म्हटलं आहे.

सुजाता आंबी यांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे अनेक लोकांनी व्हॉटसअप स्टेटस देखील ठेवले आहेत. जाऊंन द्याना बाळासाहेब या चित्रपटातील 'वाट दिसू दे रे देवा, वाट दिसू दे या' अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Read More