Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'आयटम चाहीये? चल...' भररस्त्यात महिलेकडून शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला एका व्यक्तीला रिक्षामध्ये चपलेनं मारहाण करत आहे.

'आयटम चाहीये? चल...'  भररस्त्यात महिलेकडून शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला एका व्यक्तीला रिक्षामध्ये चपलेनं मारहाण करत आहे. मारहाण करताना ही महिला त्या व्यक्तीला बोलत होती की, 'आयटम चाहीये तुझे? चल...' आणि ती सतत त्याला मारतच राहिली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, ही महिला ज्या व्यक्तीला चपलेनं मारत होती, तो व्यक्ती शिवसेना विभागप्रमुख आहे आणि त्याचे नाव जितू खाडे आहे. परंतु नक्की काय घडलं असावं असा प्रश्न लोकांना पडला आहे. तर आम्ही तुम्हाला या व्हिडीओमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगणार आहोत.

ही घटना विरार पूर्वेतील साईनाथ नगर (Sainath Nagar, Virar East) इथं घडली. जेथे एक महिला रिक्षाबाहेर उभी राहून जितू खाडेला चपलेनं मारत होती, तर एक व्यक्ती रिक्षात बसून शिवसेना विभागप्रमुख जितू खाडेला मारत होती. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.

या घटनेनंतर महिलेच्या तक्रीरीवरुन पोलीसात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यासाठी जितू खाडेचा शोध घेतला असता, आता तो फरार असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. ज्यामुळेच भररस्त्यात हा संपूर्ण प्रकार घडला.

पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तर पीडित महिला ही विरारमधील रहिवासी आहे.

Read More