Vishwas Patil Exclusive Interview To The Point With Kamlesh Sutar : महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहासावरुन वाद रंगला आहे. महाराष्ट्रातील शूर योद्धा असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नातेसंबधांबद्दल देखील वेगवेळे मत प्रवाह मांडले जात आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार संभाजीराजे नाही तर 'या' व्यक्तीने केले. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील संपूर्ण इतिहास सांगितला. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
त्या काळात नाटक हेच करमणुकीचे माध्यम होते. यावेळी ऐतिहासीक नाटके सादर करताना कुठे तरी चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला गेला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांचे संबध खूपच चांगले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे स्वराज्य आणि साम्राज्य अबाधीत ठेवण्याची इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न संभाजीराजे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आग्राच्या मोहिमेवर जाताना ते 9 वर्षाचे होते. मोहिमेला जाताना त्यांना नेले नाही. यामुळे संबाजीराजे नाराज झाले. तसेच कुटुंबातील कलह आणि सावत्र आईची कारस्थाने यामुळे पिता पुत्र्याच्या नात्यात काही फूट पडली. यानंतर संभाजीराजे सातारा सोडून पेडगावला गेले जिथं त्यांनी मुगल सेनापती दिलेर खानशी हातमिळवणी केली. त्यावेळी संभाजी महाराज केवळ 21 वर्षांचे होते. यामागे अनेक कारणे होती. मात्र चुक संभाजीराजेंच्या लक्षात आली. ते पन्हा पित्याकडे आले.
शिवाजी महाराजांचा मृत्यू हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला 3 ते 5 एप्रिल 1680 रोजी झाला मात्र, पित्याचे निधन झाले तेव्हा देखील संभाजी राजेंना कळवण्यात आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार संभाजीराजे यांना करता आले नाहीत. त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकेन छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंसंस्कार केले. निंबाळकर नावाच्या दूरच्या नातेवाईकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार केल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले.