Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संभाजीराजेंना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणीच प्रयत्न का केला नाही? प्रत्येकालाच कळायला हवा हा इतिहास

औरंगजेबने संभाजीराजेंना कैद केले. 40 ते 42 दिवस संभाजीराजे औरंगजेबच्या कैदेत होते. कुणीच संभाजीराजेंना औरंगजेबच्या तावडीतुन सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही?   

 संभाजीराजेंना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणीच प्रयत्न का केला नाही? प्रत्येकालाच कळायला हवा हा इतिहास

Vishwas Patil  Exclusive Interview To The Point With Kamlesh Sutar :  छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा, धैर्य, पराक्रम, असमान्य शौर्य,  धर्माभिमान, व्यासंगी असलेल्या संभाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवलं. शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले. तब्बल 40 दिवस औरंगजेबने सभाजीराजेंना कैद करुन त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. संभाजीराजेंना औरंगजेबाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कुणीच प्रयत्न का केला नाही? याबाबद्दल इतिहास ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी सांगितला. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी याविषयी माहिती दिली.   

संभाजीराजे औरंगजेबच्या ताब्यात होते तो 40 दिवसांचा कालावधी होता.  संभाजीराजेंना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही का? असा सवाल विश्वास पाटील यांना मुलखतीत विचारण्यात आला.  संभाजीराजे पकडले गेले तेव्हा त्यांचा एक सरदार 15 हजारांची फौज घेऊन दक्षिणेत लढत होती. संभाजीराजेंना सोडवण्याचे किरकोळ प्रयत्न झाले. 

औरंगजेबने संभाजेरांजेंवर धर्मांतर करण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल केले. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी औरंगजेबने त्यांच्यावर दबाव आणला. ऐवढ्या मोठ्या शूर राजाला कैद केल्यानंतर मराठे लोक धावत माझ्याकडे येतील सर्व किल्ले माझ्या स्वाधीन करतील असे औरंगजेबला वाटत होते. येसूबाई येतील आणि सर्व राज्य स्वाधीन करतील असे औरंगजेबला वाटत होते. येसूबाईंनी स्वत:ला अटक करुन घेतली पण स्वराज्य रक्षणासाठी दीराला वाचवले. औरंगजेबने संभाजीराजेंची क्रूर हत्या केली. तेव्हासुद्धा अनेक मराठा, ब्राम्हण, राजपूत सरदार औरंगजेबच्या तळावर होते पण कुणीच पेटून उठले नाही. संभाजीराजेंना वाचवण्यासाठी कुणीच पुढे आले नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव्य असल्याची खंत विश्वास पाटील यांनी व्यक्त केली.  

अलिबागमध्ये  पाळला जातो बलिदान मास 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे आज शेवटचे म्हणजे 40 वे पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानिमित्ताने अलीबागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून आरती करण्यात आली. फुलांमध्ये धर्मयोद्धा अशी अक्षरे साकारण्यात आली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती तर्फे याचं आयोजन करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी जे बलिदान दिलं त्याचे स्मरण व्हावे आणि भावी पिढीला त्याची माहिती व्हावी यासाठी बलिदान मास पाळला जातो.

Read More