Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

महाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. 

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

Nanded Local News :  नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघदरी गाव. प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही गावाची नोंद नाही. नकाशावर नोंद नसल्यमुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

किनवट या गावाची महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्याने कोणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अश्या कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे नाहीत. आधार कार्ड आणि राशन कार्ड तेव्हढे महाराष्ट्राचे असल्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे आहे. सर्वात अडचणीची बाब म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. 

गाव नकाशावरच नसल्याचे कळाल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी पायी आणि दुचाकीवर प्रवास करत गावात भेट देऊन समस्या जाणून घेतलीय. गावाची ई टी एस मोजणी सुरू आहे, गावाची आकारबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आलंय. काही दिवसात आकारबंदी करून हे गाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर येईल अशी अपेक्षा आहे.

तेलंगणा सीमेवर लागून महाराष्ट्राच्या हद्दीतील हे गाव आहे वाघदरी. अडीचशे लोकसंख्येच हे गाव आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आले. पण तेलंगणा सीमेवर असलेले हे गाव मात्र अजूनही महाराष्ट्राच्या नकाशावर आले नाही. महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाही. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद नसल्याने कोणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अश्या कुठल्याही योजनेचा फायदा या गावाला मिळत नाही. जात प्रमाणपत्र नाही, वनहक्क जमीन पट्टे नाहीत. आधार कार्ड आणि राशन कार्ड तेव्हढे महाराष्ट्राचे असल्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे आहे. 

जंगलातून जावे लागते गावात

सर्वात अडचणीची बाब म्हणजे या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. जलधरा या गावापर्यंत चांगला रस्ता आहे. पण तिथून पुढे सात किलोमीटर संपूर्ण रस्ता जंगलातून जातो. जलधरा पासून मांजरीमाता हे गाव साडेतीन किलोमीटर तर वाघदरी पुढे साडेतीन किलोमीटर या दोन्ही गावापर्यंत रस्ताच नाही. माळावरील चढउतार, दगडोगोटे, पाण्याचे ओढे असा खडतर प्रवास या दोन्ही गावातील ग्रामस्थांना करावा लागतो. कोणतेच वाहन जाऊ शकत नसल्याने कुणी आजारी किंवा गरोदर माता असेल तर तिला झोळी करून खांद्यावर उचलून न्यावे लागते अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर रस्त्यावरून चालणेही शक्य होत नाही. महसुली नोंद आणि गावाच्या रस्त्यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे पण कुणी दखल घेत नाही. आम्ही या भारताचे नागरिक आहोत की नाही असा गाव नकाशावरच नसल्याचे कळाल्यानंतर याआधी दोन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली नोंद होण्यासाठी प्रयत्न केले पण पुढे काहीच झाले नाही. आता सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तीकेयन यांनी पायी आणि दुचाकीवर प्रवास करत गावात भेट देऊन समस्या जाणून घेतली. गावाची ई टी एस मोजणी सुरू असून गावाची आकारबंदी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही दिवसात आकारबंदी करून हे गाव महाराष्ट्र आणि देशाच्या नकाशावर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

Read More