विकास माने, झी मीडिया
Walmik Karad Film Producer: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निलंबित पोलिस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर खळबळनजक दावा केला आहे. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा त्याने केला असून वाल्मिकच्या आयकार्डसह अलिशान ऑफिसचे फोटोदेखील व्हायरल केले आहेत.
बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोड्युसर होता? असा दावा केला आहे. याबाबतचे काही फोटोदेखील रणजीत कासले यांनी सोशल माध्यमावर व्हायरल केले आहेत. यात बीकेसी मधील प्रोडक्शन ऑफिसचे फोटो त्याबरोबरच आय कार्डचा फोटोदेखील आहे.
रणजीत कासले यांच्या दाव्यानुसार, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा वाल्मीक कराड अजीवन सभासद होता. नाग प्रतिष्ठानच्या माध्यमातून परळीतील अनेक कलाकार हजेरी लावायच्या. त्यामुळं वाल्मिक कराडचे फिल्म जगताशी संबंध होते का? याचा तपास करण्यात येत आहे. रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यात येत आहे. तसंच व्हायरल झालेल्या आयकार्डची आणि ऑफिसच्या फोटोंमध्ये किती तथ्यता आहे हे मात्र समजू शकलेले नाहीये.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. 8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत. अस विष्णू चाटे म्हणाले. त्यावेळी कायमचा धडा शिकवा अस सांगितलं. या संपुर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले. तस cdr मधुन समोर आलय. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तिन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असा युक्तीवाद उज्वल निकम यांनी केला.