Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वक्फच्या जमिनीनंतर ख्रिश्चनांच्या जमिनींवर केंद्र सरकारचा डोळा; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा अत्यंत गंभीर आरोप

वक्फ सुधारणा विधेयकावरुन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वक्फच्या जमिनीनंतर केंद्राचा डोळा ख्रिश्ननांच्या जमिनीवर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  दरम्यान राहुल गांधींनी देखील ट्विट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत टीका केली आहे.   

वक्फच्या जमिनीनंतर ख्रिश्चनांच्या जमिनींवर केंद्र सरकारचा डोळा; महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा अत्यंत गंभीर आरोप

Waqf Board Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत.. वक्फवरुन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर एक गंभीर आरोप केल आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीनंतर सरकारचा ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदूंच्या जमिनींवर डोळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरुन राहुल गांधींनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय.. तसंच इतर समुदायांच्या जमिनीवर देखील सरकारचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

वक्फ सुधारणा विधेयक आता मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणत आहे. मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी एक चुकीचा पायंडा पाडला जातोय. केंद्र सरकारचा डोळा ख्रिश्चनांच्या जमिनीवर आहे. संविधान ही एकमेव ढाल आहे, जी आपलं अशा हल्ल्यांपासून संरक्षण करतं. त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.  वक्फ सुधारणा विधेयकावरुन संजय राऊतांनी देखील केंद्रावर हल्लाबोल केला आहे. वक्फच्या दोन लाख कोटींच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय.  

दरम्यान राऊतांच्या आरोपानंतर दीपक केसरकर यांनी देखील पलटवार केलाय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलंय हे पूर्णपणे सिद्ध झालंय.. वक्फवरुन आता जे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतायत त्यावरून कळतंय. संजय राऊत यांच्यामुळे पक्षाची ही परिस्थिती झालेली आहे.  उद्धव ठाकरे आणि पक्षावर ही वेळ त्यांच्यामुळे आली आहे असं केसरकर म्हणाले. 

वक्फ सुधारणा विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूरी मिळालीय. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीसाठी हे विधेयक पाठवण्यात आलंय. मात्र, या विधेयकावरुन सुरु झालेलं राजकारण अजूनही थांबण्याचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे.

 

Read More