Wardha Crime: अंधश्रद्धेला आळा बसावा म्हणून कायदा आहे मात्र गावखेड्यात आजही अशा घटना समोर येतातच. वर्ध्यात गुप्तधन शोधलं जातंय. यासाठी खवल्या मांजराची तस्करी केली जातेय. मात्र पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
काळ बदलला पण गुप्तधनाची हाव आजही काही लोकांच्या मनात आहे. यातून अंधश्रद्धेपायी अनेक गुन्हे घडतात. पण यात मुक्या प्राण्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वर्ध्यात असाच एक प्रकार घडलाय. खवल्या मांजर जमिनीत पुरलेलं गुप्तधन शोधून देतं, अशी अंधश्रद्धा असल्यानं त्याचा वापर केला जातो. त्यासाठी खवल्या मांजराची तस्करी केली जाते.
वर्ध्यात पुलगावजवळ खवल्या मांजर विकलं जातं, अशी माहिती मुंबईच्या गुन्हेशाखेला मिळाली. मुंबईच्या पथकानं वर्धा गाठलं आणि सापळा रचला. वर्धा वनविभाग आणि पोलिसांच्या साह्यानं केलेल्या या कारवाईत एक खवल्या मांजर आणि सहा आरोपींना ताब्यात घेतलं. नेमकी खवल्या मांजराची तस्करी का केली जाते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
याआधी मालन जातीच्या सापाच्या तस्करीची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यात पाच जणांना अटक झालेली. आता खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी सहा जणांना अटक झाली. यात पायाळू मुलीचा वापर होतो, अशी धक्कादायक बाब पुढे आलीय. आता पोलिसांनी बेपत्ता मुली शोधाव्या आणि त्यांच्या घरच्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अंनिसनं केलीय. सध्याच्या AI च्या काळ आहे पण आजही गुप्तधनासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. तेच वनविभाग आणि पोलिसांसमोर आव्हान आहे.
आकुर्डे-महालवाडीमध्ये मार्गांवर दहा एकराच्या विस्तीर्ण माळरानावर केवळ एकच बाभळीचे झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू टोचलेले आढळले. तसेच झाडावर काळ्या बाहुल्याही अडकवलेल्या होत्या. एका बाहुलीवर युवतीचा फोटो होता; तर एका युवतीच्या आई, वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार अमावस्येच्या रात्री घडल्याचे बोलले जात आहे. मध्यरात्री महालवाडी येथील ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ग्रामस्थ कुराण माळावर ग्राऊंड गेले होते त्यावेळी त्यांना हा अघोरी प्रकार निदर्शनास आला.काळ्या बाहुल्यांबरोबरच युवतींचे फोटोही झाडाला बांधले असून डाबन युवतींच्या ड्रेसची बटणेही काळ्या दोऱ्यामध्ये अडकली आहेत. या भीतीदायक प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.