Wardha Deoli Ram Temple Vs BJP Ex MP: वर्ध्याच्या देवळीत भारतीय जनता पार्टीचेवि माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्या प्रकरणी आता मंदिराच्या अध्यक्षांनी मंदिर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. रामदास तडस यांनी रामनवमीच्या दिवशी आपल्याला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा केला आहे. "सोवळं अन् जानवं नसल्याने "तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही, बाहेर निघा," असं सांगण्यात आल्याचं तडस यांनी म्हटलं आहे. यावर आता देवळीच्या राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी मंदिर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. हा नेमका वाद काय आणि मंदिर प्रशासनाने काय म्हटलंय जाणून घेऊयात...
रामदास तडस यांनी रामनवमीच्या दिवशी आपल्याला प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा केला. "आज सकाळी दहा वाजता राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी मी मागील 40 वर्षापासून जातो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला राम मंदिरची स्थापना केली. मला दर्शन घेऊ न देणे काही संयुक्तिक नव्हते वाद निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्ते आणि मी बाहेर निघून आलो. आमदारांनी त्यांना या मंदिराचा ऑडिट लावतो असं सांगितलं. कार्यकर्ते भडकले होते मी सगळ्या कार्यकर्त्यांना शांत केलं. आज रामलाललाचा दिवस आहे म्हणून शांतपणे रामाचं बाहेरून दर्शन घेतलं," असं तडस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना, "मी दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो रामाचं दर्शन घेतो. हार घालतो आणि नव्याने मी आपल्या कामाला सुरुवात करतो. यावर्षी मात्र मला पुजाराकडून विचित्र वागणूक मिळाले मी त्याचा निषेध करतो. या उघडलेस आम्ही वर्गणी करून रामाची पूजा केली आणि या मंदिराची लवकरच चौकशी आमदार लावणार आहेत. या मंदिराची फेर चौकशी करावी वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात त्यांची चौकशी करावी," अशी मागणी माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.
खासदार रामदास तडस यांच्या आरोपानंतर देवळी येथील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षाची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कुणाला मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश देत नसल्याचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी म्हटले आहे. रविवारी सकाळी देखील माजी खासदार रामदास तडस यांना प्रवेश दिला गेला नाही. मंदिरात दागिने असतात व कोणत्याही नेत्यांसोबत त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत असतात त्यामुळे मूर्ती आणि मंदिराची व दागिन्यांची सुरक्षा ही महत्त्वाची असल्याचे मंदिर अध्यक्षांनी म्हटले आहे.