Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : संपत्तीसाठी तो पेटून उठला, त्याच्या कृत्याने संपूर्ण गाव हादरला

सासूच्या संपत्तीवर त्याचा होता डोळा, ती मिळवण्यासाठी त्याने उचललं थरकाप उडवणारं पाऊल

Crime News : संपत्तीसाठी तो पेटून उठला, त्याच्या कृत्याने संपूर्ण गाव हादरला

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : संपत्तीसाठी माणसं कोणत्या टोकाला जातील याचा नेम नाही. संपत्तीच्या हव्यासापोटी रक्ताची नातीही विसरली जातात. अशीच एक धक्कादायक घटना वाशिम (washim) जिल्ह्यात समोर आली आहे. 

वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील्या शेलूबाजार (shelu bazar) इथं थरकाप उडवणारी घटना घडली आहे. संपत्तीसाठी जावई सचिन धर्मराज पवार यांचं सासू निर्मला पवार आणि मेहुणी विजया गुंजावळे यांच्याशी वाद होता. हा वाद इतका टोकाला गेला की जावई सचिनने सासू आणि मेहुणीवर कोयत्याने हल्ला केला. 

या हल्ल्यात सासू निर्मलापवार आणि मेहुणी विजया गुंजावळे या दोघी जागीच ठार झाल्या. दोघींची हत्या केल्यानंतर सचिन पवार पळून जाण्याच्या बेतात होता. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. 

याप्रकरणी मंगरुपीर पोलिसांनी (mangrulpir police) आरोपी सचिन पवारला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Read More