Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, शेती-घरांचे नुकसान

 शिर्सुफळला शिरसाई योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.  

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया, शेती-घरांचे नुकसान

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शिर्सुफळला शिरसाई योजनेची पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. (Water Pipe Line burst at Baramati ) तर काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. गावानजीकच्या पाईपलाईन फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.  बारामती तालुक्यातील जिरायती गावांना या योजनेचा फायदा होत आहे. दरम्यान, पाण्याच्या उच्च दाबामुळे ही पाईपलाईन फुटल्याचे सांगण्यात येत आहे.

अति उच्च दाबामुळे पाण्याची वेग जास्त होता हे पाईपलाईनमधून हवेत उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यावरुन स्पष्ट होत आहे. आकाशात उंचच्या उंच पाणी उडत होते. अचानक हवेत पाणी दिसू लागल्याने गरिकही काही काळ भयभीत झाले होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाणी अनेकांच्या घरात, अंगणात, जनावरांच्या गोठ्यात  घुसले. त्यामुळे नुकसान झाले आहे. याठिकाणी पूरजन्य परिस्थिती  निर्माण झाल्याचे चित्र या गावात पाहायळा मिळाले आहे.

पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे  नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत या भागात पाऊस पडत होता. यातच कालव्याची पाईपलाईन फुटून पाणी शेतीत घुसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही लोकांच्या शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्यात. तर दुचाकी-चारचाकी गाड्यांचंही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पाईपलाईन दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाणीपुरवठा खंडीत करुन दुसरुस्तीचे काम केले.

Read More