Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा

धुळेकरांना पुन्हा कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार 

मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीला फुटलेल्या जलवाहिनीचा खोडा

धुळे : धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापी नदिवरील जलवाहिनीला गळती लागली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीरजवळील मेंढरेश्र्वर महाराज मंदिराजवळ या जलवाहिनीला गळती लागलो असून या गळतीमुळे उडणारा कारंजा चक्क शंभर फुटापर्यत लांब उडत होता. 

या कारंजाचे पाणी  थेट मुंबई आग्रा-महामार्गावरील एका लेनवर जाऊन पडत होते. त्यामुळे एका बाजुची वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती.

या गळतीमुळे धुळेकरांना पुन्हा कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. धुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत होणार असल्याने नागरीकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. 

ऐन पावसाळ्यात धुळेकरांना दुसऱ्यांदा अशा कृत्रिम पाणी टंचाईचा सामना  करावा लागेल.

Read More