Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नवरा बायकोच्या भांडणात नातेवाईकांनी उपसल्या तलवारी

....

नवरा बायकोच्या भांडणात नातेवाईकांनी उपसल्या तलवारी

उल्हासनगर: धक्क्दायक बातमी उल्हासनगरमधून... पती-पत्नीचं भांडण सोडवायला आलेल्या नातेवाईकांमध्येच जोरदार जुंपली आणि पोलिसांसमोरच त्यांनी तलवारी आणि चाकू बाहेर काढले. पण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या महिला तक्रार निवारण कक्षात विकास शिरसाठ आणि नेहा शिरसाठ या पती पत्नींमधला वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूचे नातेवाईक आले होते. मात्र पती पत्नीमधला वाद मिटवण्याऐवजी वाद आणखीनच चिघळला आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी पोलिसांसमोरच तलवारी आणि चाकू काढले.

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

दरम्यान, पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच या तलवारी आणि चाकू ताब्यात घेण्यात आलेत. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केलीय. त्यांच्याकडून ३ तलवारी  आणि ३ चाकू जप्त करण्यात आलेत.

Read More