भारतात यंदा वातावरणात अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. पूर्व मोसमी पावसापासून ते अगदी मोसमी पारवसांपर्यंत वातावरण बदललं आहे. यामुळे पावसाचा अंदाज सांगणे कठीण झाले आहे. असं असताना महाराष्ट्रात गेल्या चार दिवसापासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात, नागपूर, नाशिकमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागारातून येणारे चक्रीवादळ महाराष्ट्रात पोहोचले आहे. झारखंड, छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात हे चक्रवाती वादळ पोहोचले आहे. या वादळाचा फटका महाराष्ट्राला पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून 65 किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे हवामानात अनेक बदल पाहायला मिळ आहेत. येत्या 24 तासांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
13 जुलै रोजी रत्नागिरी, सातरा व नाशिक घाटपरिसर, धुळे, नंदूरबार या जिल्हयांना यलो अलर्ट, पुण्यासह नगर, पालघर, संभाजीनगर, जालना व जळगाव जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्तता आहे. तर 14 जुलै रोजी तळकोकणासह किनारपटटी भागात पावसाचे यलो अलर्ट- यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयांसह पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यालाही यलो अलर्ट आहे.
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत बुहतांश भागात पावसाची स्थिती सामान्य आहे.
राज्यात पुढील दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच 7 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची स्थिती सामान्य राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. शनिवारी हवामान विभागाने चार आठवड्याचा विस्तृत हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार जुलैच्या दुस-या पंधरवाड्यातही राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.