Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान कोसळून २ ठार, ७ गंभीर जखमी

अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ग्रामिण भागातील अनेक गावागावांमध्ये अशा प्रकारच्या स्वागत कमानी आपल्याला पहायला मिळतात. 

बांधकाम सुरू असलेली स्वागत कमान कोसळून २ ठार, ७ गंभीर जखमी

औरंगाबाद : बांधकाम काम सुरू असलेली गावातील स्वागत कमान कोसळून झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्वागत कमानीसाठी एकूण १६ कामगार काम करत असल्याची प्राथमीक माहिती आहे. औरंगाबाद येथील फुलंब्री जवळील निधोना येथे ही घटना घडली आहे.

अशा प्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ग्रामिण भागातील अनेक गावागावांमध्ये अशा प्रकारच्या स्वागत कमानी आपल्याला पहायला मिळतात. आशा प्रकारच्या स्वागत कमानी उभारण्याची एक फॅशनच गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील ग्रामिण भागात पहायला मिळते आहे. अनेकदा गावांच्या विकासाचा निधी वळवून स्वागत कमानी उभारण्याचा घाट गावातील राजकीय मंडळींकडून केला जातो.

Read More