Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

विहीर कोसळून ढीगाऱ्याखाली ५ जणांचा मृत्यू

विहीर कोसळून एका मजुरासहित चारजण गाडले गेल्याचे वृत्त 

विहीर कोसळून ढीगाऱ्याखाली ५ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : राज्य कोरोनाच्या संकटातून चालले असताना पन्हाळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहीर कोसळून पाच जणांचा मृत्यूची झाल्याचा दुर्देवी प्रकार समोर आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ही घटना घडली. कोडोली काखे मार्गावर विहीर कोसळून एका मजुरासहित चारजण गाडले गेल्याचे वृत्त हाती येत आहे. 

या घटनेत दोघा जणांना वाचवण्यात यश आले आहे. विहिर कोसळल्याची बातमी कळताच आजुबाजुची माणसं गोळा झाली. अदयाप स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे. ही घटना नेमकी कशी घडली ? याची चौकशी सुरु आहे. 

Read More