पुण्यात एका ज्वेलर्स मालकाने स्थानिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. गोल्ड भिशीमध्ये लावलेले पैसे घेऊन हा ज्वेलर्स पळून गेला आहे. विष्णू दहिवाल नावाच्या या ज्वेलर्सने परिसरातील तब्बल 1 हजार महिलांना फसवलं आहे. यानंतर पुन्हा एकदा Gold Bhishi चर्चेत आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणं किती फायद्याचे आणि सुरक्षित आहे, यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
गोल्ड भिशी ही इतर प्रचलित भिशींपेक्षा वेगळी असते. या गोल्ड भिशीमध्ये रोकड रक्कम सोनाराकडे किंवा ज्वेलर्सकडे जमा केली जाते. गुंतवणूकदाराला गोल्ड भिशीमध्ये 11 महिने स्वतः पैसे द्यायचे असते. त्यानंतर 12 वा हप्ता सोनाराद्वारे किंवा ज्वेलर्सद्वारे भरला जातो.
गोल्ड भिशी ही 12 महिन्यापासून 36 महिन्यांपर्यंत पैशांची गुंतवणूक केली जाते. यामध्ये 1 हजार रुपयापासून ते 5 किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाते. जर 1 वर्षासाठी ही भिशी असेल तर त्यामध्ये 11 महिने गुंतवणूकदार आणि 1 महिना ज्वेलर्स भरतो.
Gold Bhishi चे नियम हे ज्वेलर्स किंवा सोनाराकडून ठरविले जातात. यामध्ये सोनार 1 ते 3 वर्षांसाठी ही भिशी चालवतो. प्रत्येक गुंतवणूकदाराला शेवटच्या महिन्याचे पैसे सोनार देतो.
यामध्ये तुम्हाला सोनाराकडून 12 महिन्याच्या पैशाचे त्यावेळेच्या सोन्याच्या दरानुसार गोल्ड क्वाईन किंवा वळ देतो.
तसेच जर गुंतवणूकदाराला सोन्याची वस्तू खरेदी करायची असेल तर त्या रकमेएवढी खरेदी करावी लागते.
(हे पण वाचा - सावधान! सोन्याची भिशी लावताय? पुण्यात नेमकं काय घडलंय बघा?)
गोल्ड भिशीमध्ये सोनं खरेदी करताना ती योग्य की अयोग्य असा काही प्रश्न नसतो. ही भिशी कोणत्याही कायद्याच्या अंतर्गत येत नाही. पण जर सोनाराने फसवले तर ही बाब चुकीची ठरते. अनेकदा 24 कॅरेट सोन्याचा भाव लावून 22 किंवा 18 कॅरेट सोन्याचे दागिने माथी मारले जातात. यानुसार गुतंवणूकदारांची फसवणूक केली जाते.
पुण्याच्या धायरीतील श्री ज्वेलर्सच्या दुकानासमोर जमा झालेल्या या गोरगरिब महिलांची भिशीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली आहे.जास्तीच्या व्याजाचं अमिष दाखवून या विष्णू दहिवाल ज्वेलर्सनं परिसरातील तब्बल 1 हजार महिलांना फसवलं आहे. या महिलांचे भिशीचे पैसे घेऊन हा ज्वेलर्स आता पसार झाला आहे.