Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

साधू-संन्याशांचे राजकारणात काय काम ?, भाजपा आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

साधू-संन्यास्यांना सर्वोच्च स्थान मिळत असल्याचे वक्तव्य भाजप आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे. 

साधू-संन्याशांचे राजकारणात काय काम ?, भाजपा आमदाराचा पक्षाला घरचा आहेर

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सर्वाधिक साधु-संन्यासी हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. भाजपाची अनेक महत्त्वाची पदे, साधु-संन्यासी असलेल्यांना देण्यात आली आहेत. भाजपासाठी ही जमेची बाजु असली तरी आता याच कारणावरुन भाजपा आमदाराने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षात साधू-संन्यास्यांना सर्वोच्च स्थान मिळत असल्याचे वक्तव्य भाजप आमदार विलासराव जगताप यांनी केले आहे. या साधु सन्यासांचे राजकारणात काय काम ? असा प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केला आहे. जगताप यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयतं कोलीथ मिळालं आहे. आता या वक्तव्याबद्दल भाजपा आमदारांवर काय कारवाई करते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पक्षात साधू-संन्याशांना सर्वोच्च स्थान दिल जातंय, त्यांचं राजकारणात काय काम ? असं वक्तव्य करत आमदार जगताप यांनी पक्षाला घराचा आहेर दिला आहे. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जगताप बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने ते पक्षांतर्गत अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राजकारणात चांगल्या गुणांना वाव राहिलेला नाही. सोलापूर मतदारसंघात भाजपचे सिद्धेश्वर स्वामी निवडून आले आहे. त्यांचे राजकारणात काय काम आहे ? तसेच हे स्वामी लोक राजकारणात का येत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाहीतर सोलापूर मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आमदार जगताप यांनी यावेळी स्तुतीसुमने उधळली आहेत. 

Read More