Mumbai and Pune Mock Drill News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचे ढग निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. अशात सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बुधवारी 7 मे रोजी देशात मॉकड्रीलचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रील घेऊन नागरिकांनी युद्धाच्या परिस्थितीत कसे स्वत:चे संरक्षण करायचे याचे धडे दिले जाणार आहे. तसंच हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
मुंबई हे अतिसंवेदनशिल श्रेणीत असून बुधवारी 7 मे रोजी दुपारी 4 वाजता मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. मुंबई शहरातील विविध 60 ठिकाणी सायरन वाजवले जाणार आहेत. दक्षिण मुंबईतील एका मैदानात नागरिकांना जमा होण्यास सांगितले जाणार आहेत. तसंच नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील्स घेण्यात येणार आहे. या मॉक ड्रील्समुळे काही भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या सरावाचा उद्देश युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांची आणि प्रशासनाची तयारी तपासणे आणि युद्धकाळात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कसे पोहोचावे याचे प्रशिक्षण देणे हा आहे. हे ब्लॅकआऊट संपूर्ण मुंबईत नसेल, तर उपनगराच्या एका छोट्या भागात केले जाणार आहे. यादरम्यान परिसरातील लाईट बंद होईल आणि परिसर निर्मणुष्य केला जाणार आहे.
पुण्यात या ठिकाणी वाजणार सायरन!
मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रील घेण्यात येणार आहे. 80 ठिकाणं नागरी सुरक्षा विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे.
1. आगाखान पॅलेस नगर रोड, पुणे-६
2. इंडियन केबल हडपसर, पुणे-१३
3. एस.आर.पी.एफ. ग्रुप रामटेकडी, पुणे-२२
4. हिंगण स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे-५२
5. पुणे मुलींची अंधशाळा, कोथरुंड, पुणे ३२९
6. छत्रपती संभाजी मनपा शाळा क्रं. ७०, कोथरुड, पुणे-२९
7. एस.एन.डी.टी. कॉलेज कर्वे रोड, पुणे
8. किसान कोथरुड, पुणे-२९
9. एरंडवणे फायर स्टेशन कर्वे रोड, पुणे
10. किर्लोस्कर बँक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड, पुणे
11. फर्ग्युसन कॉलेज, पुणे
12. गव्ह. टेक्निकल स्कूल, घोले रोड
13. अॅग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
14. गव्ह. पॉलिटेकनिक, चतुःश्रृंगी, पुणे
15. पाषाण तलाव, पाषाण, पुणे-८
16. एन. सी. एल. पाषाण, पुणे-८
17. पोलीस मोटारवर्कशॉप, औंध, पुणे -२७
18. श्री. शिवाजी विदयामंदिर औंध, पुणे-२७
19. पर्वती वॉटर वर्क्स, सिहंगड रोड, पुणे-९
20. धर्मवीर संभाजी म.न.पा. शाळा नवी पेठ, पुणे
21. रेल्वे स्टेशन शिवाजीनगर, पुणे-५
22. एल.आय.सी. बिल्डींग, नारायण पेठ, पुणे-३०
23. पी. एम. टी. वर्कशॉप, स्वारगेट
24. सेंट जोसेफ टेक. स्कूल, शंकरशेठ रोड, पुणे
25. सेंट्रल फायर बिग्रेड भवानी पेठ, पुणे-२
26. म.न.पा. शाळा भवानी पेठ, (सावित्रीबाई हायस्कुल) पुणे-२
27. म.न.पा.शाळा नानावाडा बुधवारपेठ, किंकर राम प्रशाला, पुणे-२
28. म.न.पा. दवाखाना सोन्या मारुती चौक, हुतात्मा बाबु गेणु रविवारपेठ, पुणे-२
29. पुणे जिल्हा परिषद सोमवार पेठ, पुणे-११
30. शांताबाई लडकत मनपा शाळा, नाना पेठ, पुणे-२
31. महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ, पुणे-२
32. म.न.पा. आयात कर भवन, शिवाजीनगर, पुणे-५
33. सुदर्शन केमिकल इन्स्डस्ट्रीज आर टी ओ शेजारी, संगमवाडी, पुणे
34. बाबुराव सणस म न पा कन्या शाळा, मंगळवार पेठ, पुणs
35. पर्णकुटी येरवडा, पुणे-६
36. ना.सं. येरवडा सब कंट्रोल येरवडा,
37. एस. पी. कॉलेज, टिळक रोड, पुणे
38. पुनम रेस्टॉरेंट, डेक्कन जिमखाना, पुणे-४
39. श्री. शिवाजीमराठा हायस्कुल, शुक्रवार पेठ, पुणे
40. केशवराज जेधे मनपा शाळा, (गंज पेठ) महात्मा फुले पेठ,
41. वैदिक संशोधन मंडळ मुकुंद नगर, पुणे
42. ना.सं. पर्वती उपनियंत्रण केंद्र, पर्वती पुणे-९
43. शंकरराव मोरे विदयालय, पौड रोड, पुणे
44. मेढी फॉर्म गोखलेनगर, पुणे
45. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन मनपा शाळा, बोपोडी, पुणे-१२
46. पी डब्ल्यू डी वर्कशॉप, दापोडी, पुणे-१२
47. जयहिंद सिनेमा खडकी, पुणे-३
48. रेल्वे पोलीस मुख्यालय, खडकी, पुणे
49. जे एन पेटीट टेक्नि. हायस्कुल, बंडगार्डनरोड, पुणे
50 .बँक ऑफ महाराष्ट्र लक्ष्मी रोड, पुणे-२
51. वेस्टर्न इंडिया हाऊस लक्ष्मी रोड, पुणे
52. न्यु इंग्लिश स्कुल, रमण बाग पुणे
53. वनाज फॅक्टरी, पौड रोड
54. इंजिनिअरिं कॉलेज, शिवाजीनगर, पुणे
55. सरस्वती विदयामंदिर विदयालय, (घारपुरे हायस्कुल, शुक्रवार पेठ,) पुणे
56. अभिनव कला महाविदयालय, टिळक रोड, पुणे-३०
57. कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड, पुणे-३७
58. महाराष्ट्र कृत्री उदयोग विकास महामंडळ, मार्केट यार्ड, पुणे
59. यशवंतराव चव्हाण, प्रशाला बिबवेवाडी,
60. विश्वकर्मा टेक्नि. इन्स्टि, अपपर इंदिरा नगर, पुणे
61. कौन्सिल हॉल, कम्पाऊंड, पुणे-१
62. अपंग संस्था वानवडी, पुणे-४०
63. रेल्वे लायब्ररी बिल्डींग, रेल्वे घोरपडी, संस्था, पुणे-४९
64. भारत फोर्ज कंपनी मुंढवा, पुणे
65. सेंट्रल जेल येरवडा, पुणे-६
66. रेल्वे स्टेशन पुणे,
67. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, (राजभवन) पुणे
68. लॉ कॉलेज, प्रभात रोड, पुणे-४
69. इंडस्ट्रियल ऑक्सिजन नगर रोड, पुणे
70. सिम्बॉयसिस कॉलेज, सेनापती बापट रोड, पुणे
71. वैभव टॉकीज हडपसर, पुणे-२८
72. राजर्षि शाहू म.न.पा. शाळा मुंढवा
73. पुणे कॅन्टोंन्मेंट ऑफिस
74. वानवडी कॅन्टोन्मेंट शाळा
75. डॉ. आंबेडकर हायस्कुल, पुणे कॅन्टोन्मेंट
76. घोरपडी डिस्पेन्सरी पुणे कॅन्टोन्मेंट
77. अॅम्युनिशन फॅक्टरी, खडकी
78. ओ.सी.एस. दिघी (V.S.N.L.) दिघी
79. कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी कॅन्टों.
80.कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी बाजार, शाळा