करिश्मा हगवणे हिनेच वैष्णवीचा सर्वात जास्त छळ केल्याचं समोर आलं आहे. करिश्मा ही देखील वैष्णवीला मारहाण करत होती. तसंचकरिश्माचीच हगवणे कुटुंबात दादागिरी चालायची. वैष्णवीनं कोणाशी बोलायचं कोणाशी बोलू नये? हे देखील करिश्माच ठरवत होती. नेमकं करिश्मा हगवणे मध्ये असं काय होतं
वैष्णवीच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा अमानुष छळ केला मारहाण केली. तसंच पैशांची देखील तिच्याकडे वारंवार मागणी केली जात होती. दरम्यान याच छळाला कंटाळून वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं. मात्र, वैष्णवीलाहगवणे कुटुंबात सर्वात जास्त त्रास झाला तो करिश्मा हगवणेकडून. करिश्मा हगवणे हीच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचंही आता उघड झालं आहे.
34 वर्षाची करिश्मा ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. वैष्णवीनं कोणती साडी घालायची?, कोणाशी बोलायचं कोणाशी बोलायचं नाही हे देखील करिश्माच ठरवायची. एकाच छताखाली असूनही करिश्मानं वैष्णवी आणि मयुरीला कधी बोलू दिलं नाही. हगवणे कुटुंबातील सदस्य देखील करिश्माचंच ऐकत होते.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून संपूर्ण कुटुंबाची कसून चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे करिश्मानं वैष्णवीला मारहाण करत तिच्या आई-वडिलांच्या घरीही सोडलं होतं. या प्रकरणात करिश्माच मुख्य व्हिलन असल्याचंही समोर आलं आहे. करिश्मानं वैष्णवीला मारहाण केली, तिच जास्त छळ करायची अशी देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एक मुलगी असूनही करिश्मानं वैष्णवीचा अमानुष असा छळ केला. वैष्णवीचं मन करिश्मानं कधी समजूनच घेतलं नाही. उलट तिला मारहाण आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे वैष्णवीवर हगवणे कुटुंबात जो अन्याय झाला. त्याची शिक्षा हगवणे कुटुंबाला झाल्याशिवाय राहणार नाही.