Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

‘बचपन का प्यार’... अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? नको त्या वयात जेलमध्ये पडले पाय

गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. 

‘बचपन का प्यार’... अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? नको त्या वयात जेलमध्ये पडले पाय

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. पण ती बोलत नसल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने थेट तिचे घर गाठले आणि कुटुंबियांसमोर त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्याची ती धमकी ऐकून त्या मुलीच्या आईने नातेवाईकांकडे मदत मागितली. इतक्यात त्याने मदतीला येणाऱ्या दोन नातेवाईकांवर चाकूने हल्ला चढविला. इकडे मुलीच्या नातेवाईकांनाही दुसऱ्या गटातील एकावर चाकूने हल्ला केला. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यातील दोघे गंभीर असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.

याप्रकरणात दोन्ही गटांतील सात जणांवर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सातपैकी तीन विधिसंघर्षित बालके आहेत. त्यातील एक श्रीनगर, दुसरा पैकनटोली तर तिसरा भीमनगरातील आहे.

Read More