Man Forcibly Kissed Youth In Crowded Passenger Train: एका पुरुषाने धावत्या पॅसेंजर ट्रेनमध्ये एका तरुणाचे चुंबन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ ज्या मुलाचं चुंबन घेण्यात आलं त्यानेच रेकॉर्ड केला आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझं चुंबन घेतलं कसं? असा जाब हा तरुण चुंबन घेणाऱ्या पुरुषाला विचारत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला जाब विचारणारा हा तरुण नंतर या इसमाला मारहाण करताना व्हिडीओत पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार पुणे-हटिया एक्सप्रेसमध्ये घडला आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या तरुणासोबत हा विचित्र प्रकार घडला त्याचं नाव निर्मल मिश्रा असं आहे.
हा व्हिडीओ नेमका कधी आणि केव्हा शूट करण्यात आला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. झी 24 तासही याची कोणतीही पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल जाला आहे. पीडित तरुणानेच हा व्हिडीओ शूट केला आहे. खचाखच भरलेल्या पॅसेंजर ट्रेनमध्ये पीडित तरुणाचं ज्या व्यक्तीने चुंबन घेतलं त्याला जाब विचारला जात आहे. या ट्रेनमध्ये लोक मधल्या पॅसेजमध्ये उभे आहेत, दोन सीटच्यामधील जागेत झोपल्याचं दिसत असल्याने ट्रेनच्या जनरल डब्यातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.
तरुणाचं चुंबन घेणारा व्यक्ती लोअर बर्थवर बसलेला असून आपण झोपेत असताना या व्यक्तीने आपलं चुंबन घेतल्याचा दावा पीडित तरुण करत आहे. ट्रेनमध्ये इतके लोक असताना या व्यक्तीने आपल्या परवानगीशिवाय आपलं चुंबन घेतल्याचा जाब विचारताना या तरुणाने मी त्याला का असं केलं विचारलं असता त्याने, "अच्छा लगा कर दिया" असं उत्तर दिल्याचं म्हटलं. तसेच या आरोपीची पत्नी आपल्या पतीची बाजू घेताना, "काही हरकत नाही, जाऊ दे," असं म्हणत असल्याचंही या तरुणाने म्हटलं आहे. मात्र या तरुणाने आपण हे प्रकरण असेच जाऊ देणार नाही असं म्हणत या माणसाला खेचून बाहेर काढलं आणि चोप दिला.
तरुणाने बघ्यांची भूमिका घेणाऱ्या सहप्रवाशांवर पण टीका केली आहे. हेच जर एखाद्या मुलीबरोबर घडलं असतं तर सगळ्यांनी मिळून चुंबन घेणाऱ्याला मारलं असतं. या व्यक्तीच्या पत्नीबरोबर असं काही घडलं असतं तर त्याने सुद्धा मारहाण केली असती, असं पीडित तरुण म्हणतो. यानंतर आरोपी पीडित तरुणाची माफी मागतो. "चूक झाली, जाऊ दे!" असं पीडित तरुण म्हणतो. त्यानंतर हा तरुण अधिकच चिडतो आणि आरोपीला शिव्या देत बाहेर खेचू लागतो. त्यावेळी आरोपीची पत्नी मध्यस्थी करायचा प्रयत्न करते आणि सोडा त्याला, जाऊ द्या असं म्हणताना दिसते. मात्र हा तरुण तिला, 'दीदी, तुम्ही बाजूला व्हा' असं म्हणत आरोपीला खेचून बाहेर काढून चोप देतो.
आरोपीला मारहाण केल्यानंतर हा तरुण मोबाईलवर शूट करणाऱ्याला पोलिसांना फोन करायला सांगतो. मात्र या प्करणामध्ये पोलिसांनी काही मदत केल्याची माहिती समोर आलेली नाही.