Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Dhule Cash Case: खोतकरांच्या अडचणी वाढणार? पीएच्या खोलीत कोट्यवधी रुपये आढळले

Dhule Cash Case: शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खोतकरांच्या पीएच्या खोलीत कोट्यवधी रुपये आढळलेत.  

Dhule Cash Case: खोतकरांच्या अडचणी वाढणार? पीएच्या खोलीत कोट्यवधी रुपये आढळले

प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे: शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खोतकरांच्या पीएच्या खोलीत कोट्यवधी रुपये आढळलेत.आता या प्रकरणात धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. नेमकं काय घडलंय, पाहुयात.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंचे आमदार चर्चेत आहेत. आता शिंदेंचे आणखी एक शिलेदार अर्जुन खोतकर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत. खोतकरांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत तब्बल 1.84 कोटी रुपये आढळलेत...विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि 12 आमदारांचा नुकताच धुळे दौरा झाला.या दौ-यादरम्यान खोतकरांच्या पीएच्या रुममध्ये हे पैसै आढळले होते...ही रक्कम आमदार खोतकर आणि समितीच्या सदस्यांना वाटण्यासाठी गोळा केली होती, असा आरोप करण्यात आलाय.

शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन केलं...गोटेंनी खोलीबाहेर ठिय्या देत राज्यातील सर्व यंत्रणांना ही माहिती पुरवली. यानंतर गोटे यांनी पोलिसांवरही आरोप केलाय...पोलीस सारवासारव आणि प्रकरण दडपण्यात व्यस्त होती, असा आरोप गोटे यांनी केलाय.

 

धुळे न्यायालयानं आमदार अर्जुन खोतकरांचे पी. ए. यांच्यावर खंडणी , संगनमत करून कटकारस्थान रचणं अश्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती के. बी. चौगुले यांनी आदेश देत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाच्या या आदेशावर पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read More