नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी विविध योजना सुरु करण्यात आली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा याचे प्रयत्न सुरु आहेत. रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार आहोत. आता तांदळासोबत एक किलो डाळही देणार आहोत. तूरडाळ किंवा हरभरा डाळ उपलब्ध असेल तसे देण्यात येणार आहे. तर काही रेशन दुकानदारांनी गडबड केली आहे, त्यांच्यावर कारवाई केली, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची येथे दिली.
BreakingNews । रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार । तांदळासोबत एक किलो डाळही देणार। तूरडाळ किंवा हरभरा डाळ उपलब्ध असेल तसे देणार । काही रेशन दुकानदारांनी गडबड केली आहे, त्यांच्यावर कारवाई केली । अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 25, 2020
#Lockdown #COVID19
@ashish_jadhao pic.twitter.com/sRVgdBx7eb
केसरी कार्ड धारकांना अन्नधान्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विदर्भ मराठवाड्यात २४ पासून वाटप सुरु झाले आहे तर काही भागात मे पासून सुरु होणार आहे. केंद्र सरकार पाठवीत आहे तसतशी उपलब्धता होत आहे. वाटप यंत्रणा ५३ हजार दुकानावर अवलंबून आहे. त्यांच्याही चौदा हजार तक्रारी आल्या आहेत. काही दुकानदारांनी गडबड केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे भुजबळ म्हणालेत.
१९ एप्रिलपर्यंत ३९ रेशन दुकानावर ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४८ परवाने रद्द करण्यात आले आहेत. चंद्रपूर ११, वर्धा ४ , अमरावतीत १३परवाने रद्द आणि गुन्हे दाखल आहेत. औरंगाबादमध्ये २९ परवाने रद्द केलेले आहेत. बीडमध्ये १२ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. सर्वत्र अशी परिस्थिती नाही अनेक दुकानदार धोक्यात काम करत आहेत, त्यांना मारहाण करण्यात येत आहे, हे चुकीचे आहे, असे भुजबळ यावेळी म्हणालेत.
दुकानदारांना संरक्षण द्यावे अशी डीआयजीकडे मागणी केली आहे. काही ठिकाणी शिक्षकांची पोलीस ,तहसीलदार यांची मदत घेण्यात येत आहे. रेशन संघटनेच्या दुकानदारांनी मारहाण होत असल्याने दुकाने बंदचा इशारा देण्ययात आला आहे. मात्र त्यांच्या सुरक्षा बंदोबस्त करत आहोत, इतकच नाही त्यांचा विमा उतरविण्याचा विचार करत आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.