विशाल करोळे (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी नगर : सायबर भामट्यांनी आता डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक कऱण्याचं सत्र सुरू केलं आहे. अनेकजण या डिजिटल अरेस्टला बळी पडतायत. संभाजीनगरमधील एका 55 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टमुळे 61 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आताच सावध होण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढत चाललेत. या डिजिटल अरेस्टबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत, मात्र तरिही अनेकजण या डिजिटल अरेस्टचे बळी ठरतायत. छत्रपती संभाजीनगरमधील एका 55 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी लुटलं आहे. उल्कानगरीत राहणा-या रिना नंदापूरकर यांची 61 लाखांची फसवणूक झालीये. सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगत सायबर भामट्यांनी त्यांना लाखोंचा गंडा घातला आहे. या दीड महिन्याच्या कलाधीत रीना यांना घरातून बाहेर पडण्याची आणि कुणाशीही बोलण्याची परवानगी नव्हती.
हेही वाचा : ऑनलाइन ट्रॅव्हल बुकींगमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात फसवणूक, केंद्र सरकारकडून टुरिझम ॲडव्हायझरी जारी!
4 मार्च रोजी रिना नंदापूरकरांना भामट्यांचा फोन आला होता. यावेळी त्यांनी सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगितले. रिना यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचा बनाव केला. वय जास्त असल्याने डिजिटल अरेस्ट करत असल्याचं सांगितलं. 2 टप्प्यात रिना यांच्या खात्यावरील पैसे त्यांनी काढून घेतले. सुरुवातीला 45 लाख खात्यावरून काढून घेण्यात आले. त्यानंतर 9.5 आणि 5.5 लाख असे एकूण 61 साथ लुटले. पैसे परत न झाल्याने अखेर महिलेने पोलिसात तक्रार देण्यात आली.
डिजिटल अरेस्ट असा कोणताच प्रकार नसून जर तुम्हाला असा कोणता फोन आल्यास संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. डिजिटल अरेस्टबाबत जनजागृती केली जाते आहे. मात्र तरिही असे प्रकार वारंवार घडतायत. त्यामुळे डिजिटल अरेस्टना बळी पडू नका. या प्रकाराबाबत सावध राहण्याची अधिक गरज आहे.