Sanjay Shirsat Son Case : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एक विवाहित महिलेने गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात सदर महिलेने सिद्धांत यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. या नोटीसमध्ये त्या महिलेने लग्न, गर्भपात, शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. पण आता सिद्धांत शिरसाट प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सदर महिलेने सिद्धांत यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत.
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालं.
'या महिलने आरोप मागे घेताना हे आपलं घरगुती प्रकरण असून या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही ती महिला म्हणाली. संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले मी आरोप मागे घेते. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये.'
तसंच महिला म्हणाली की, 'सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने केला. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करतेय. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही असं ती महिला म्हणाली. हे प्रकरण मला संपवायचं आहे, मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असं ती महिला म्हणाली.