Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमळनेरमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

वीज कोसळल्याने एक तरुणी जखमी

अमळनेरमध्ये अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम येथे अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर या घटनेत शेतमालकाची मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निम येथील कपिलेश्वर मंदिर शिवारात ही घटना घडली आहे. ललिता रवींद्र भिल असे मृत महिलेचे नाव असून नेहा गुलाब चौधरी ही तरुणी जखमी झाली आहे. 

शेतात कपाशी निंदणीचे काम करत असताना अचानक जोरदार मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. त्याच वेळी चिंचेच्या झाडावर वीज कोसळली. त्यात ललिता रविंद्र भिल या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर नेहा गुलाब चौधरी ही तरुणी गंभीर जखमी झालीय. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात शांताराम सुपडू भिल्ल यांनी माहिती दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read More