Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून

 रात्रीच्या सुमारास एका महिलेने हात बांधलेल्या अवस्थेतील चार वर्षीय चिमुकलीला सोडून दिले 

धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून

ठाणे : नौपाडा परीसरातील गावदेवी मंदिरासमोर रात्रीच्या सुमारास एका महिलेने हात बांधलेल्या अवस्थेतील चार वर्षीय चिमुकलीला सोडून दिले होते. या घटनेचं सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळालं आहे. 

नौपाडा पोलिसांनी त्या  मुलीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं होतं. चिमुकलीच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर जखम झाली होती. उपचारानंतर मुलीची रवानगी नवी मुंबई बालसंगोपन केंद्रात केली आहे. 

दरम्यान 'त्या' मुलीला सोडून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातानाचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. आई आणि पप्पांनी मारलं असं पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं आहे. पीडित चिमुकलीच्या निर्दयी पालकांचा पोलीस शोध घेत आहेत. 

Read More