Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

3 भाषांचं ओझं विद्यार्थ्यांवर टाकणं चुकीचं, हिंदी भाषेची सक्ती करु नये

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्यात येणार असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरलं आहे. 

3 भाषांचं ओझं विद्यार्थ्यांवर टाकणं चुकीचं, हिंदी भाषेची सक्ती करु नये

ब्युरो रिपोर्ट झी 24 तास : पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला कलाकार आणि साहित्यिकांनी देखील विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे आणि तारा भवाळकरांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्यात येऊ नये असं मत व्यक्त केलं आहे. तसंच गावागावातून हिंदीला विरोध करण्यात यावा असं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं आहे.  

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्यात येणार असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरलं आहे. खासकरून मनसेनं हिंदीला विरोध करत राज्य सरकारला इशाराही दिला आहे. मात्र, आता हिंदीलाविरोधात राज्यातील कलाकार आणि साहित्यिक एकवटले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी पहिलीपासून हिंदी शिकवण्याला कडाडून विरोध केला आहे. गावागावात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केला पाहिजे अंस आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 

अभिनेते सयाजी शिंदेच नव्हे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी देखील पहिलीपासून हिंदीला विरोध केला आहे. तसंच तीन भाषांचं ओझं विद्यार्थ्यांवर लादणं चुकीचं असल्याचंही तारा भवाळकर यांनी म्हटलं आहे. तसंच इंग्रजी देखील चौथीपर्यंत शिकवली जाऊ नये असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

शिक्षक आणि पालक म्हणून पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध असल्याचं तारा भवाळकर यांनी स्पष्ट केलंय. तसंच पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा सल्ला राज्य सरकारला कोणी दिला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सल्ला देणा-या प्रत्यक्षातल्या अडचणींची माहिती नसते असंही यावेळी तारा भवाळकरांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याला चहू बाजूंनी विरोध होत आहे. विरोधी पक्ष देखील हिंदी शिकवण्यावरून आक्रमक झाला आहे. आता अभिनेते आणि साहित्यिक देकील हिंदीविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज्य सरकार हिंदीसंदर्भात कोणता निर्णय घेणार? पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेणार की आपल्या निर्णयावर ठाम राहणार हे पाहावं लागणार आहे. 

Read More