X Outage: आताचे एक्स जे आधी ट्विटर म्हणून जगभरात ओळखले जायचे त्याच्या यूजर्ससाठी महत्वाची बातमी समोर आलीय. ट्विटरच्या अनेक युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतोय. ट्विटर यूजर्सना सोमवारी एक मोठी समस्या जाणवली. डाउनडिटेक्टर या एक ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग सेवेने याचा रिपोर्ट दिलाय. ज्यानुसार ट्विटर डाऊनसंदर्भात भारतातून सुमारे 2 हजार, युनायटेड स्टेट्समधून 18 हजार आणि युनायटेड किंग्डममधून 10 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या.
डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, आउटेज दरम्यान अमेरिकेतील 57 टक्के यूजर्सना X अॅपमध्ये समस्या आल्या. तर 34 टक्के यूजर्सना वेबसाइटमध्ये समस्या आल्या. 9 टक्के यूजर्सना सर्व्हरशी संबंधित अडचणी आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलंय.
यूकेमध्ये 61 टक्के यूजर्सना एक्स वापरात समस्या आल्या. 34 टक्के यूजर्सना वेबसाइटमध्ये अडचणी आल्या. 5 टक्के यूजर्सना सर्व्हरच्या समस्या आल्याचे म्हटले आहे.