Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

Yavatmal News: युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

Yavatmal News: लाडकी लेक युपीएससी उत्तीर्ण झाली मात्र मुलीच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच कुटुंबावर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. यवतमाळ च्या महागाव तालुक्यातील वागद (इजारा) येथे ही दुःखद घटना घडली आहे. मुलीच्या यशाचे कौतुक करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

प्रल्हाद खंदारे असं निधन झालेल्या वडिलांचे नाव आहे. युपीएससीमध्ये मुलीला चांगली रँक मिळाली म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करत होते. त्याचवेळी वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे. 

प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी खंदारे हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चांगली रँक मिळाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्दाह खंदारे हे ग्रामस्थांना पेढ्यांचे वाटप करत होते. ग्रामस्थांना पेढे वाटप करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काहीच वेळात ते खाली कोसळले. खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यामुळं खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

यूपीएससीच्या निकालात महाराष्ट्राच्या मुलांची मुसंडी

युपीएससीच्या निकालात यंदाही महाराष्ट्राच्या मुलांनी जोरदार मुसंडी मारलीये. पहिल्या शंभरात पहिल्यांदाच 5 मुलं ही महाराष्ट्रातली असून एकूण यादीतला हा मराठी मुलांचा आकडा 80 च्यावर गेला आहे. यूपीएससीतला मराठी टक्का वाढावा म्हणून तेलंगानातले वरिष्ठ पोलीस अधिकारी महेशजी भागवत या मुलांना खास दिल्लीत जाऊन मार्गदर्शन करत असतात. पुण्यातही यूपीएससीचा निकाल लागताच मुलांनी ज्ञानप्रबोधनी शाळेसमोर जल्लोष साजरा केला आहे. 

Read More