Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गोरखपूर ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात, महिला जखमी

गोरखपूर ते कर्नाटकातील यशवंतपूर येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला मोठा अपघात होता होता वाचला. 

गोरखपूर ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात, महिला जखमी

नागपूर : नागपूरजवळ मोठी रेल्वे दुर्घटना टळलीय.गोरखपूर ते कर्नाटकातील यशवंतपूर येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला मोठा अपघात होता होता वाचला. एक्स्प्रेसला एसी बोगीच्या चाकाचा भाग तुटल्याने अपघात झाला. मात्र, ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. हा अपघात नागपूरपासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात एक महिला जखमी झाली.  १५०१५ ही एक्स्प्रेस यशवंतपूरला जात होती. त्यावेळी ए-२ या डब्याच्या चाकाचे दोन तुकडे पडले. त्यामुळे मोठ्याने रुळावर आवाज झाला.

यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसचं चाक तुटलं. नागपूरजवळच्या काटोल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. गाडीच्या एसी बोगीचं चाक तुटलं.उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरहून कर्नाटकच्या यशवंतपूरला ही ट्रेन जात होती. या गाडीच्या ए टू या बोगीचं चाक तुटलं आणि ट्रेनच्या खालच्या बाजूनं आत हे तुटलेलं चाक घुसलं. यामध्ये एक प्रवासी महिला जखमी झालीय. मात्र, मोठी दुर्घटना टळलीय. 

fallbacks

Read More