Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कबुतर चोरल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाला मारहाण, VIDEO व्हायरल

मारहाणीचा व्हिडिओ त्या मुलाच्या घरच्यांनी पाहिला, त्यानंतर हा प्रकार उघडीस आला

कबुतर चोरल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाला मारहाण, VIDEO व्हायरल

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. कबूतर चोरल्याच्या संशयावरून पुण्यातील येरवडा परिसरामध्ये अल्पवयीन मुलाला दोन अल्पवयीन मुलांनी बॅट आणि पट्ट्याने मारहाण केली.

याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पुण्याच्या येरवडा परिसरात असलेल्या औद्योगिक शाळेमध्ये अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी त्याचे दोन अल्पवयीन मित्र आले आणि तू आमचं कबुतर चोरलं असं म्हणत त्या मुलाला बेल्ट आणि पट्ट्याने नग्न करून जबर मारहाण केली. 

हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनीच सोशल मीडियावर व्हायरल केला. या मुलाला मारहाण होत असताना इतर मुलंही ही मारहाण पाहत होते मात्र त्याला सोडण्यासाठी कुणीही गेलं नाही.

मारहाणीची घटना या मुलाने आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवल. पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो घरच्यांनी पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर घरच्यांनी मुलाला सर्व प्रकार विचारला आणि पोलीस स्टेशन कडे धाव घेतली.  मारहाण झालेल्या मुलाची तक्रार पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात आहे .

Read More