Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एक परीक्षा तुमच्या जीवनाचं लास्ट लोकेशन ठरवू शकत नाही...

'माय लास्ट लोकेशन इज' स्टेट्स ठेवत तरुणाने जीवन संपवलं...आयटीआय परीक्षा ठरलं कारण 

एक परीक्षा तुमच्या जीवनाचं लास्ट लोकेशन ठरवू शकत नाही...

भंडारा : नापास झाल्याच्या नैराश्यातून आयटीआयच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना भंडरा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याने ही घटना आली आहे. पोलिस घटनास्थळी शोध घेत असून त्या विद्यार्थ्याचं जॅकेट आणि सायकल पोलिसांना आढळून आली आहे.

नेमकी घटना काय?
20 वर्षांचा अनुराग गायधने असं तरुणाचं नाव असून तो भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या आयटीआय प्रशिक्षण शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. आयटीआय परीक्षेत नापास झाल्याने अनुराग नैराश्यात होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. माडगी इथल्या वैनगंगा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

आत्महत्येपूर्वी अनुरागने आपल्या मोबाईलवर "माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज '' असं स्टेटस ठेवलं होतं. यामुळे कुटुंबाला आणि त्याच्या मित्रांना ही गोष्ट कळली. त्यांनी तातडीने पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले, स्विमर्सच्या मदतीने नदीपात्रात अनुरागचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

पण अद्यापही पोलिसांना अनुराग सापडलेला नाही. त्यामुळे अनुरागने खरच आत्महत्या केली की आत्महत्येचा बनवा केला याबाबत पोलीस तपास करत आहेत. 

Read More