Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

आंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

एसटी आणि बाईकच्या धडकेत हा युवक ठार झालाय. मंगेश बोडेकर असं या युवकाचं नाव असून तो फोडा हरकुळ इथला रहिवाशी आहे. 

आंगणेवाडी यात्रेचा दुसरा दिवस असून शेकडो भक्त भराडीदेवीच्या दर्शनासाठी दाखल झालेत. त्यातच या अपघातात या युवकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतेय. 

यात्रेसाठी भाविकांची तुफान गर्दी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीची यात्रा म्हणजे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान. या यात्रेसाठी चाकरमान्यांसह राजकीय नेतेही मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. यावर्षी 26 जानेवारीनंतर शनिवारी ही यात्रा ठरवण्यात आल्यानं सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दरवर्षी पेक्षा यंदा गर्दीचा इथे उच्चांक पाहायला मिळत आहे. 

Read More