Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Crime News : पोलिसांचा धाक राहिलेला की नाही असच चित्र दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनसमोर झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.

Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Crime News :  छत्रपती संभाजीनगरमधून  (औरंगाबाद) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही का असं प्रश्न उपस्थितीत होतोय. क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच एका तरुणाला काही जणांनी मारहाण केली. या मारहाणीत बीसीएसमध्ये शिकणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. रविवारी पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. कल्पेश विजय रूपेकर असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

क्रांती चौक पोलिसांनी पोलीस ठाण्यासमोरील बुद्धविहाराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पहाटे तीन वाजता कल्पेशला वैभव मालोदे आणि इतर तीन जण लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या फुटेजमुळे कल्पशचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट होतं आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी कल्पेशाचा भाऊ अविनाश रूपेकर याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. वैभव मालोदे, वैभव गिरी, सौरभ भोले आणि प्रेम तीनगोटे यांना अटक केली. जुन्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. दरम्यान कल्पेश रूपेकर यांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात आरोपींना अटक करण्यासाठी रविवारी आक्रोश केला होता.

पाहा सीसीटीव्ही फूटेज

त्याच्या आईने टाहो फोडत आरोपींवर पोलीस जोपर्यंत कारवाई करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि त्यांना मारेकरांना पकडण्याचे आश्वासन दिले. दरम्यान रूपेकरसोबत असलेल्या मित्रांचा शोध घेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात एका रेकॉर्डवरील आरोपीचा समावेश असल्याच समोर आलंय.

Read More