Zee24Taas Ganesh Festival Special Contest: कोट्यवधी गणेशभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्या सणाला म्हणजेच गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढील दहा दिवस प्रत्येकजण गणरायांच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसेल. यंदाच्या गणेशोत्सव हा अधिक खास असणार आहे. कारण यंदा 'झी 24 तास' गणेशभक्तांसाठी सोन्याची नाणी जिंकण्याची संधी घेऊन आलंय. विशेष म्हणजे पुढील दहा दिवस दररोज सोन्याचं नाणं जिंकण्याची संधी गणेशभक्तांना मिळणार आहे.
आता सोन्याचं नाणं जिंकण्यासाठी नेमकं काय करावं लागेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पद्धत फार सोपी आहे. तुम्हाला तुमच्या बाप्पाचा व्हिडीओ आणि तुमच्या डेकोरेशनची संकल्पना अगदी थोडक्यात सांगायची आहे. हे सारं तुम्हाला पाठवायचं व्हॉट्सअपवर आणि ईमेलआयडीवर. तसेच हा व्हिडीओ तुम्हाला 'झी 24 तास'च्या एक्स (आधीचं ट्विटर) हॅण्डलला म्हणजेच @zee24taasnews टॅग करुन #24taasganesha हॅशटॅग वापरुन शेअर करायचा आहे.
पाठवण्यात आलेल्या व्हिडीओंमधून आम्ही दोन गटांमध्ये बक्षिस देणार आहोत. यापैकी पहिलं बक्षिस असणार आहे बेस्ट डेकोरेशन आणि दुसरं असणार आहे, बेस्ट बाप्पा!
+91 85888 06022
24taasganesha@zeemedia.com
विजेत्यांची नावं 24taas.com वर पाहता येतील. तसेच विजेत्यांची नावं 'झी 24 तास'च्या चॅनेलवरही झळकतील.
चला तर बघूया 'झी 24 तास' आणि जिंकूया सोन्याची नाणी!
Ganesh Chathurthi 2024 | यंदाचा गणेशोत्सव होणार खास, दररोज सोनं जिंकण्याची खास संधी तुमच्या बाप्पाच्या व्हिडिओ आणि तुमच्या सजावटीची संकल्पना पाठवा थोडक्यात
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 6, 2024
जिंका सोन्याची नाणी#ganeshchathurthi #ganpatibappamorya #zee24taas #ladkamajhabappa pic.twitter.com/MAUUUyofSp
प्रेझेंटीग स्पॉन्सर - फॉर्चून रिफाइंड सनफ्लॉवर ऑईल
सेफ्टी पार्टनर - गोदरेज स्मार्ट लॉक्स
नॅचरल पेन रिलीफ पार्टनर - रिलीफस्प्रे
गिफ्टींग पार्टनर - अॅसपेक्ट बुलियन अॅण्ड रिफायनरी