Marathi News> मराठवाडा
Advertisement

भारतातील सर्व संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात; नितिन गडकरींच्या विधानाची चर्चा

नितीन गडकरी यांनी  एका कार्यक्रमात देशातील वाढती गरिबी आणि संपत्तीच्या असमान वाटपावर भर दिला. ते म्हणाले की, हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती एकवटत आहे, जी एक धोकादायक परिस्थिती आहे.

भारतातील सर्व संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात; नितिन गडकरींच्या विधानाची चर्चा

Nitin Gadkari :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते विधानांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांच्या एका विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतातील सर्व संपत्ती काही लोकांकडे असं विधान त्यांनी केले आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढती गरिबी आणि संपत्तीच्या असमान वाटपाबद्दल चिंता व्यक्त केली.  काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती एकवटत आहे, जी धोकादायक आहे. तसेच  जागतिक युद्धाबद्दलही त्यांनी एक मोठे विधान केले आहे. काही महासत्तांची हुकूमशाही असल्याने जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. तिसरे महायुद्ध कधीही सुरू होऊ शकते असंही ते म्हणाले. 

एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान आपल्या भाषणात गडकरी यांनी हे वक्तव्य केले. भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, जी सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देते. त्यामुळे जगात घडणाऱ्या घटनांकडे पाहून आपण भविष्यातील धोरणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. युद्धांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कधीही महायुद्ध सुरू होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

युद्धाची भिती व्यक्त करताना त्यांनी भारतातील वाढत्या गरिबीबाबातही चिंता व्यक्त केली. भारतातील आर्थिक परिस्थितीवर चर्चा केली. आपल्या देशात समृद्धीचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक झाले आहे. कारण गरिबांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  संपत्ती काही लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. त्यांनी शेती, उद्योग, कर व्यवस्था आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) यासारख्या विषयांवरही भाष्य केले. आपल्या भाषणात गडकरी म्हणाले, 'ज्याचे पोट रिकामे आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही असेही गडकरी म्हणाले. हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे. ते म्हणाले की, काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती जमा होत आहे. असे होऊ नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे विकसित झाली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि गावे विकसित होतील. 

आजच्या युद्धांनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती केली आहे. मानवतेचे रक्षण करणे कठीण होत चालले आहे, असे ते म्हणाले. चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, टँक आणि लढाऊ विमानांसारख्या शस्त्रांचे महत्त्व खूप कमी झाले आहे. आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सारख्या शस्त्रांचा वापर जास्त होत आहे. दुर्दैवाने, आता मानवी वस्त्यांवरही क्षेपणास्त्रे टाकली जात आहेत, अशा परिस्थितीत परिस्थिती कठीण होत चालली आहे.  आपण सर्वजण हळूहळू विनाशाकडे वाटचाल करत आहोत. महासत्तांच्या हुकूमशाही आणि राजवटीमुळे जगात संवाद, प्रेम आणि सौहार्द संपत चालले आहे.' ते म्हणाले की, या मुद्द्यांवर जगभरात चर्चा झाली पाहिजे आणि वेळेवर पावले उचलण्याची गरज आहे असं गडकरी म्हणाले. 

 

Read More