Chhatrapati Sambhaji Maharaj Crime News : महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्रम्हराक्षसांनी थैमान घातले आहे. ब्रम्हराक्षस नावाच्या दोघा भावांनी आपल्याच चुलत्याची भयानक पद्धतीने हत्या केली आहे. यांचे हे कृत्य आणि आणि त्यांची चुलत्याची हत्या का केली? यामागचे कारण जाणून पोलिसही हादरले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचाळा गावात ही घटना घडली आहे. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी आठ दिवसानंतर मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. नामदेव ब्रम्हराक्षस असं हत्या झालेल्या आलेल्या व्यक्तीचं नाव असून बाबासाहेब आणि आबासाहेब ब्रम्हराक्षस अशी आरोपींची नाव आहेत. हे कृत्य "क्राईम पेट्रोल" मालीका पाहुनच सुचल्याच आरोपींनी पोलिसांना सांगितले.
नामदेव ब्रम्हराक्षस हे त्यांच्याकडील 15 गुंठे असलेली जास्तीची जमीन देत नसल्यानं खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. पाचोड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. रक्ताच्या नात्यात असलेल्या चुलत पुतण्यांनीच चोरटे आल्याचा बनाव करत विहीरीकडे नेऊन जमिनीच्या वादातून 65 वर्षीय चुलत्याची हत्या केली. कोयत्याने धडावेगळे मुंडके करून मृतदेह विहीरीत फेकले आहे.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱया खारघर मधील ऍड. मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरणातील तिघा दोषी आरोपींना पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना, सरकारी वकील ऍड.उज्वल निकम यांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर करुन पुराव्याची साखळी न्यायालयात सिध्द केली. न्यायालयाने उपलब्ध परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरुन अखेर या गुन्ह्यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या ऍड. मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना दहा वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या ऍड. मीनाक्षी जयस्वाल खारघरमधील वास्तु विहार सेलिब्रेशन इमारतीत राहत होत्या. त्यांचे पती डॉ. संतोष जयस्वाल हे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) म्हणून मालेगाव येथील न्यायालयीन सेवेत कार्यरत होते. ऍड. मीनाक्षी जैस्वाल यांची 19 डिसेंबर 2014 रोजी त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती.चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती, त्यांच्या हत्येनंतर नवी मुंबईसह संपुर्ण रायगड जिह्यात खळबळ उडाली होती. खारघर पोलिसांनी या गुह्याचा तपास करत विनायक थावरा चव्हाण, मणिन्दर सिंग उर्फ मिठ्ठू, सुरज रामभवन जयस्वाल आणि सुरेंद्रकुमार चमनलाल बत्रा या चार आरोपींना अटक केली होती.
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुरेंद्रकुमार बत्रा या आरोपीचा मृत्यू झाला. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात सुरु होती. सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी अभियोक्ता ऍड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले, तर त्यांना ऍड. प्रसाद पाटील यांनी सहकार्य केले. खटल्यात एकूण 20 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सर्व साक्षी व पुरावे तपासून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 302 सह 34, 392 सह 34 आणि 397 सह 34 अंतर्गत दोषी ठरवले होते. शनिवारी न्या. एस. एस. शिंदे यांनी या खटल्याचा निकाल घोषित केला.
यात आरोपी मनिंदर बाजवा, विनयक चव्हाण, सुरज जैयस्वाल या तिन्ही आरोपींना मिनाक्षी जयस्वाल यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील दागिने चोरुन नेल्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्यांच्या घरात बळजबरीने घुसल्याप्रकरणी कलम 397 नुसार मनिंदर बाजवा आणि सुरज जैयस्वाल या दोघांना 7 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्याचप्रमाणे त्यांना 70 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा ऍड. मिनाक्षी जयस्वाल (46) यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांचे पती ऍड.संतोष जैस्वाल यांनी समाधान व्यक्त करत याचे श्रेय न्यायपालिकेला तसेच सरकारी वकील ऍड. उज्वल निकम यांना दिले आहे.