Marathi News> मराठवाडा
Advertisement

अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमेश्वर पाटील या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ठिबक सिंचनचे अनुदान जमा न झाल्यामुळे तसेच अधिकाऱ्यांच्या उडवा-उडवीच्या उत्तरामुळे आत्मदहनाचा केला प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. सोमेश्वर पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमेश्वर हे गेले काही दिवस आपल्याला मिळाणाऱ्या अनुदानाच्या रक्कमेसाठी सरकारी कार्यालयात खेटा मारत होते पण त्यांना तिथून प्रतिसाद मिळत नव्हता. या कारणाने व्यथित होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. 

Read More