Marathi News> सिनेमा
Advertisement

अनुष्का सोबतच्या लग्नानंतर असं बदललंय विराटच आयुष्य

विराट कोहली-अनुष्का शर्मा गेल्यावर्षी ११ डिसेंबर २०१७ ला पारंपारिक पद्धतीने इटलीत विवाहबंधनात अडकले होते.

अनुष्का सोबतच्या लग्नानंतर असं बदललंय विराटच आयुष्य

मुंबई | भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या लग्नाला आज वर्ष झालं आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा गेल्यावर्षी ११ डिसेंबर २०१७ ला पारंपारिक पद्धतीने इटलीत विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतरच्या वर्षभरात जीवनात झालेल्या बदलांवर विराट व्यक्त झाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत विराट कोहली आपल्या वैवाहिक जीवनावर बोलत आहे. जेव्हा पासून अनुष्काला भेटलोय, तेव्हापासून माझ्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. याआधी मी इतका प्रॅक्टीकल नव्हतो. अनुष्काकडून मी खूप काही शिकलो आहे. असं कोहली या व्हिडीओत म्हणाला आहे.

आम्ही दोघे आमच्या कामात व्यस्त असतो. जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा सोबत घालवतो. मुंबईत राहत असल्याने एकमेकांसोबत वेळ घालवणं शक्य होतं. आम्ही दोघे वेळ कसा घालवतो, असा विचार लोकं करतात. पण खर सांगायच तर आम्ही सुद्धा सामान्य माणसांसारखचं वेळ घालवतो. भेटल्यावर एकत्र राहतो.

भारत संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आपल्या बिजी शेड्यूल मधून वेळ काढून अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाला गेली आहे.

Read More